बेळगाव : राकसकोप जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे, अशी माहिती एलअँडटीने दिली आहे. ऐन उन्हाळ्यात जलवाहिनीला गळती लागल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. अखेर जलवाहिनी दुरूस्ती काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र राकसकोप जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला सोनोली गावानजीक गळती लागली होती. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. अखेर सोमवारी एलअँडटी कंपनीने दुरस्तीचे काम तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.वाढत्या उष्म्यामुळे शहरात पाण्याची टंचाई निर्माण होऊन लागली आहे.
त्यामुळे काही भागात चार-पाच दिवसाआड पाण्याच पुरवठा होऊ लागला आहे. काही ठिकाणी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यातच वारंवार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनोना गळती लागल्याने पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. दिवसेंदिवस राकसकोप व हिडकल जलाशयाच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत शहराला सुरळीत पाणी पुरवठा होणार का, याबाबत चिंता व्यक्त होत आहे. सोमवारी दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. वाढत्या उन्हामुळे शहरातील पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र हिडकल जलाशयाची पाणीपातळीत घटली आहे. शिवाय या जलाशयावर बेळगावबरोबर संकेश्वर व हुक्केरी शहराचा भार आहे. त्यामुळे शहरातील पाण्याची समस्या डोकेदुखी ठरणार आहे. त्यातच 24 तास पाण्यासाठी जलवाहिनी घालण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. दरम्यान जलवाहिनीसाठी खोदाई केली आहे.









