मालवण/प्रतिनिधी
मालवण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धामापूर येथून येणारी 200 मिमीची मुख्यवाहिनी कासार टाक्का येथे चौके – कुडाळ मुख्य रस्त्यामध्ये जीर्ण होऊन फुटल्यामुळे मुख्य वाहिनीच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. त्यामुळे मुख्य वाहिनीच्या दुरुस्तीसाठी किमान चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत मालवण शहर आणि अन्य भागात एक दिवस आड करुन आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नळधारकांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .
Previous Articleगरिबांचा ‘फ्रीज’ बनवणारं कोल्हापूर जिल्ह्यातलं हे अनोखं गाव……
Next Article ४० वर्षात ना रस्ता… ना गटार !









