दुरुस्तीमुळे 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान पाणीपुरवठ्यात व्यत्यय
बेळगाव : पुरेसा पाऊस पडल्याने जलाशयांमध्ये बऱ्यापैकी पाण्याचा साठा आहे. पण शहरवासियांना मात्र सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कधी जलवाहिनी फुटल्यामुळे तर कधी विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीटंचाई निर्माण होते. आता पुन्हा दि. 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान शहराला पाणीपुरवठा करण्यामध्ये व्यत्यय निर्माण होणार आहे. हेस्कॉमतर्फे 110/33 केव्ही ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या एकाच ट्रान्स्फॉर्मरवर बेळगाव शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र आता वीजपुरवठा खंडित होणार असल्याने कुंदरगी आणि तुम्मरगुद्दी येथील पंपहाऊसमधून पाणी उपसा होणार नाही. परिणामी शहराला पाणीपुरवठा होण्यामध्ये व्यत्यय निर्माण होणार आहे. मुख्य म्हणजे 24 तास योजनेचाही पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
या भागात खंडित पाणीपुरवठा होणार
दक्षिण विभाग- मजगाव, नानावाडी, शहापूर, चिदंबरनगर, वडगाव, जुने बेळगाव.
उत्तर विभाग- सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, टी. व्ही. सेंटर, सदाशिवनगर, बसव कॉलनी, कलमेश्वरनगर, सुभाषनगर, अशोकनगर, माळमारुती विस्तारीत विभाग, न्यू गांधीनगर, कणबर्गी, कुडची, अन्य विभाग, कॅन्टोन्मेंट एरिया, हिंडाल्को फॅक्टरी, केएआरडीबी औद्योगिक वसाहत, डिफेन्स विभाग, सैनिकनगर, केएलई हॉस्पिटल व बिम्स.









