कोल्हापूर :
बालिंगा उपसा केंद्र येथे महाविरणच्या वतीने येथील सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीचे मासिक देखभाल दुरुस्तीचे काम सोमवारी सकाळी हाती घेण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा हे काम पूर्ण झाल्यामुळे मंगळवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. उर्वरीत भागात बुधवार पासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे कामकाज सोमवारी सकाळी हाती घेण्यात आले. यामुळे सोमवारी दिवसभर बालिंगा उपसाकेंद्राचा विद्युत पुरवठा बंद राहिला. याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला. मात्र सोमवारी रात्री उशिरा हे काम पूर्ण करण्यात आले. सोमवारी दुपारनंतर व मंगळवारी सकाळी शहरातील काही भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. सोमवारी रात्री उशिरा विद्युत वाहिनीचे काम पुर्ण झाल्याने मंगळवारी सकाळी शहरातील काही भागात अपुरा पाणीपुरवठा झाला. दुपारनंतर शहरातील पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत झाला.








