चंबुखडी टाकीवरील मुख्य व्हॉल्वमध्ये बिघाड, दुरूस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा राहणार बंद
कोल्हापूर प्रतिनिधी
चंबुखडी टाकीवरील मुख्य व्हॉल्वमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्हॉल्व दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात सोमवारी (दि. 4) चंबुखडी टाकीवर अवंलबून असलेल्या भागामध्ये पाणी पुरवठा होवू शकणार नाही. त्याचबरोबर मंगळवारी (दि.5) होणार पाणी पुरवठा नियोजित वेळेपेक्षा कमी व अपुऱ्या दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन मनपाने केले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर
लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नानापाटीलनगर, तुळजा भवानी कॉलनी, देवकर पाणंद, हरीओमनगर, रंकाळा परिसर, टेंभेरोड, शिवाजीपेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुतीचौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदूचौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, अंबाबाई मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवलक्लब, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक.









