प्रतिनिधी/ बेळगाव
आदर्शनगर, पाचवा क्रॉस येथील 450 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने दि. 14 मे रोजी पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. राजारामनगर, ब्रह्मनगर, मजगाव, चिदंबरनगर, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, मांगिरीश कॉलनी, आर. सी. नगर फर्स्ट व सेकंड स्टेज या परिसराला पाणीपुरवठा करण्यामध्ये व्यत्यय निर्माण होणार आहे, असे पाणीपुरवठा मंडळाने कळविले आहे.









