बेळगाव प्रतिनिधी – सह्याद्रीनगर, सारथीनगर, पोलीस कॉलनी, डी ग्रुप कॉलनी, आणि आश्रय कॉलनी येथे दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तेव्हा तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा बॉक्साईट रोड येथे रस्ता रोको करू, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या सर्व परिसराला पाणी नसल्यामुळे टँकरने पाणी खरेदी करावे लागत आहे. या पाण्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. याबाबत अनेक वेळा एल अँड टी या पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे हे अखेरचे निवेदन असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. महसूल अधिकारी एस. एम. बरगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नामदेव हट्टी, एस. एस. नागणूर बी.आर. ढाबळे, स्वामी हिरेमठ, आरिफ खान, एम. डी कलशेट्टी यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









