सांगली :
वारणा धरणात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २८.१५ टी.एम. सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून जिल्हयात पावसाने उघडीप दिली आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी. एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे : कोयना ७२.५१ (१०५.२५), धोम ९.९२ (१३.५०), कन्हेर ७.५० (१०.१०), धोम बलकवडी २.१५ (४.०८), उरमोडी ७.१६ (९.९७), तारळी ४.९९ (५.८५), वारणा २८.१५ (३४.४०), राधानगरी ६.८५ (८.३६), दूधगंगा १७.४९ (२५.४०), तुळशी २.७६ (३.४७), कासारी १.९९ (२.७७), पाटगांव ३.३२ (३.७२), अलमट्टी ८९.२७ (१२३).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे : कोयना धरणातून २१००, कण्हेर ७४०, उरमोडी ५००, तारळी १७२४, वारणा ४५००, राधानगरी ३१००, दुधगंगा १६००, तुळशी ३००, कासारी ८००, पाटगाव ३००, हिप्परगी बॅरेज ९६ हजार ४०० व अलमट्टी धरणातून १ लाख क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली १५.३ (४०) व अंकली पूल हरिपूर १८ (४५.११).
जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.
मिरज १.१ (१४१.५), जत ०.० (९५.१), खानापूर-विटा ०.४ (१०५.५), वाळवा-इस्लामपूर ०.४ (२४९.३), तासगाव ०.२ (१२९.५), शिराळा २.६ (६३४), आटपाडी ०.१ (९७.६), कवठेमहांकाळ ०.० (११२.५), पलूस १.६ (२००.५), कडेगाव १.२ (१६०.७).








