जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आमदार केसरकरांना आश्वासन
सावंतवाडी । प्रतिनिधी.
आमदार दीपक केसरकर यांनी पर्यटन , शिरशिंगे धरण प्रकल्प , हत्तीप्रश्न ,वन्यप्राणी , कबुलायतदार गावकर जमीन वाटप , खाजगी वनजमीन वाटप आधी विविध प्रश्नांसंदर्भात वनमंत्री गणेश नाईक, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई या चार मंत्र्यांची मुंबई येथे भेट घेतली . त्यांच्यासमोर विविध प्रश्न मांडले . सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिरशिंगे धरण प्रकल्प लवकरच सुरू केला जाईल असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले . तर शिरोडा – वेळागर येथील पंचतारांकित हॉटेल्स व पाणबुडी प्रकल्पही लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील असे आश्वासन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.वनमंत्री गणेश नाईक यांनी हत्ती हटाव मोहीम लवकरच घेण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल व कबुलायतदार जमीन प्रश्न, खाजगी वन जमिनीच्या प्रश्नासंदर्भातही निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कबुलायतदार जमीन संदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.









