दोन दिवस बंद असलेला मार्ग वाहतुकीसाठी खुला
बेळगाव : बेळगाव वेंगुर्ला रोडवरील दाटे व बाजार कानूर या दोन्ही ठिकाणचे पाणी कमी झाल्याने वेंगुर्ला बेळगाव मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे, अशी माहिती चंदगडचे पोलीस निरीक्षक सविनय सादर यांनी दिली. गेले दोन दिवस आलेल्या पुरामुळे या दोन्ही ठिकाणचे मार्ग बंद करण्यात आले होते. कालपासून पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे या मार्गावरील पाणी ओसरले आहे. त्यामुळे आज वाहतुकीसाठी मार्ग खुले करण्यात आले आहेत.









