खाली करावे लागू शकते शहर : इराणचे राष्ट्रपती
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणची राजधानी तेहरान हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. येथे 1 कोटीहून अधिक लोकांचे वास्तव्य आहे. परंतु आता हे शहर पाण्याच्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जातेय. जर पाऊस पडला नाही तर पाण्याचे रेशनिंग सुरू होईल, डिसेंबरपर्यंत दुष्काळ कायम राहिल्यास तेहरान शहर खाली करावे लागू शकते असे इराण सरकारचे सांगणे आहे. तेहरानमध्ये पाण्याचे साठे संपण्याच्या मार्गावर आहेत. अमीर कबीर धरणाचे जलाशय मागील वर्षाच्या तुलनेत केवळ सहावा हिस्सा शिल्लक राहिला आहे. निम्म्याहून अधिक प्रांतांमध्ये कित्येक महिन्यांपासून पाऊस पडलेला नही. सरकार रात्रीचय वेळ नळ बंद करण्याची योजना आखत आहे. दोन आठवड्यांमध्ये पिण्याचे पाणी संपू शकते असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पाऊस न पडल्यास पाण्याचे रेशनिंग करावे लागणार आहे. डिसेंबरपर्यंत दुष्काळ कायम राहिल्यास तेहरान सोडावे लागणार आहे. हे ऐकण्यास भीतीदायक वाटते, परंतु हीच वस्तुस्थिती आहे. इराण दशकांमधील सर्वात वाईट दुष्काळाला तोंड देत असल्याचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियर यांनी म्हटले आहे.
या संकटाचे मूळ
सरकार या स्थितीकरता हवामान बदलाला दोष देत आहे, हवामान बदलत असून उष्णतेच्या लाटा येत आहेत, तापमान 50 अंशाच्या वर पोहोचत आहे. पावसाचे प्रमाण कमी हो असून तेहरान क्षेत्रात पावसाचे प्रमाण 100 टक्के कमी झाले आहे.
अधिक शेती अन् पाण्याचा गैरवापर
इराहणमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी शेतीकरता वापरले जाते. परंतु ही शेती जुन्या पद्धतीने केली जाते. शेतकरी अधिक पाणी लागणारे पीक घेतात, यात तांदूळ आणि गव्हाचा समावेश आहे. यामुळे नद्या कोरड्या पडत असून जायदेंह रुद यासारख्या नद्या आता ऋतुकालीन प्रवाह ठरल्या आहेत. धरणांच्या निर्मितीमुळे नद्यांचा प्रवाह बिघडला असून दलदलयुक्त जमीन नष्ट झाली आहे.
भूजलाचे अत्याधिक दोहन
इराणने भूजलाचे इतके दोहन केले आहे की आता ते पुन्हा भरले जात नाही. शहरांमध्ये वेगाने इमारती उभ्या राहिल्या, लोकसंख्या वाढली, परंतु पाण्याची योजना तयार झाली नाही. तेहरान सारख्या शहरांमध्ये पाण्याची मागणी दुप्पट झाली, परंतु पुरवठा तितकाच राहिला.
सरकारी निष्काळजीपणा
सरकारने अनेक वर्षांपर्यंत या समस्येकडे दुर्लक्ष केले, धरणे कुठल्याही विचाराशिवाय तयार करण्यात आली, हवामान बदलाला गांभीर्याने घेण्यात आले नाही. कृषी आणि पायाभूत क्षेत्रासाठी चुकीची धोरणे आखण्यात आली. आतार्यंत कुठलाच मोठा प्लॅन आहे. हे आत्मघाती व्यवस्थापन असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
सरकार काय करतेय
इराण हताश असून आता शेजारी देश अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, उझ्बेकिस्तानकडून पाणी मागवत आहे. ही कूटनीति नव्हे तर हतबलता आहे. तेहरानमध्ये रात्रीच्या वेळ नळ बंद राहणार असून काही भागांमध्ये पूर्वीपासूनच कपात सुरू आहे. परंतु पाऊस न पडल्यास ही पावलेही तोकडी ठरणार आहेत.









