टँकरद्वारे पाणी पुरवठा, जुनी जलवाहिनी बदलण्याची मागणी
प्रतिनिधी/ वाळपई
होंडा पंचायत क्षेत्रातील भुईपाल चेकपोस्ट येथे जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया जाऊन ग्रामस्थांचे हाल झाले. श्री देवी लइराईच्या धोंडगणांचे सध्या व्रत सुरू असून त्यांनाही या समस्येचा सामना करावा लागला. मात्र वाळपई पाणी पुरवठा विभागाने त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
होंडा पंचायत क्षेत्रातील भुईपाल गावाला दाबोस जलशुद्धीकरण प्रकल्पांतून पाणी आणून वितरीत केले जाते. त्यासाठी अंतर्गत जलवाहिनी घालण्यात आली असून ती जीर्ण झालेली आहे. त्यामुळे पाण्याच्या उच्च दाबामुळे वारंवार फुटत असते.
पाण्याच्या टाकी पासून सुमारे 500 मीटर लांब जुनीच जलवाहिनी आहे, त्याठिकाणी नवीन जलवाहिनी घालण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवून त्याला मंजुरी सुद्धा मिळून कामाची निविदा काढली आहे, परंतू अद्याप कामाला सुऊवात केली नाही. येथे वारंवार जलवाहिनी फुटून पाणी समस्या निर्माण होत आहे. या प्रकरणी आमदार डॉ देविया राणे यांनी लक्ष घालून जलवाहिनी बदलण्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांतफ्xढ फुटलेल्या जलवाहिनीच्या दुऊस्तीचे काम तातडीने हाती घेतले असून ते काम उशिरापर्यंत सुरू होते.









