पाणी बिल भरणार नाही,घरफाळा पण चुकविणार,प्रत्येक वर्षी दरवाढीला विरोध करणार आणि महापालिकेने विकासकामे केली पाहिजेत,अशीही ओरड करणारी शहरात आहेत.ही मानसिकमता आता बदलावी लागणार आहे. नागरिक म्हणूनही काही कर्तव्ये असून त्याचे पालन सर्वांनी केले पाहिजे.यातूनही मनपा कुठे चुकली तर त्यांच्याकडे बोट दाखविण्याचा अधिकार राहणार आहे.मात्र,स्वत: मनपाची देणी ठेवायची आणि दुसरीकडे महापालिकेकडून विकासकामांची अपेक्षा करायची हे कितपत योग्य आहे.
कोल्हापूर महापालिकेची 50 वर्षात एक इंचही हद्दवाढ झालेली नाही.परिणामी मनपाच्या उत्पन्नाला मर्यादा आहेत.दुसरीकडे महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्राsत कमी होत आहेत.वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही.जी काही वसुली होते त्यापैकी 65 टक्के पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या पगार,पेन्शनसह इतर देण्यावर खर्च होतात.मग विकासकामे कशी होणार याचाही विचार झाला पाहिजे.
मनपाचे गत आर्थिक वर्षी (2021-22) 472 कोटींचे उद्दिष्ट असताना 380 कोटी वसुली झाली. यंदा 2022-23 चे उद्दिष्टे 515 कोटींचे असून आतापर्यंत 300 कोटींचीच वसुली झाली आहे.विशेष म्हणजे हक्काचे उत्पन्न मिळवून देणारे घरफाळा आणि पाणीपट्टी विभागातूनच अपेक्षित वसुली होत नाही.गतवर्षी घरफाळाच्या वसुली उद्दिष्टापेक्षा 50 टक्केही झाली नाही.तर पाणीपुरवठा विभागाही वसुली 61 टक्केच झाली.यंदाही या विभागाची अशीच स्थिती आहे.एकीकडे घरफाळा,पाणीपट्टी भरायची नाही.दुसरीकडे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजना पूर्ण केल्या नाहीत म्हणून मनपावर ताशोरे ओढणे,हे आता थांबले पाहिजे. विरोध करणाऱ्यांनीही मनपाचे उत्पन्न वाढीचे पर्याय पुढे आणावेत
दरवाढ नको पण विकास पाहिजे.
मनपाच्या अर्थसंकल्पावेळी घरफाळा आणि पाणीपुरवठा विभागाचा दरवाढीचा प्रस्ताव आला की विरोध केला जातो.हेच नंतर रस्ते खराब झाल्यावरून मनपा विरोधात आदोंलन करतात.दरवाढ नको पण विकास झाला पाहिजे,अशी वृत्तीच शहराला मारक ठरत आहे.
पाणी बील भरणार नाही पण विकासकामे झाली पाहिजे
वास्तविक महापालिका पाटबंधारे विभागाकडून पाणी खरेदी करून शहरवासियांना देते.या विभागाला वर्षाला 10 कोटींचा तोटा होत आहे.असे असतानाही पाणी बील नियमित भरले जात नाही.घरफाळा विभागही याला अपवाद नाही.घरफाळा,पाणी बील भरणार नाही पण महापालिकेने अर्थसंकल्पानुसार विकासकामे केले पाहिजे,असे म्हणणाराही एक गट आहे.
शेकडो रूपयांचे पाण्याचा कॅन घेणार पण पाणी बील थकवणार
घरगुती कार्यक्रमावेळीही शेकडे रूपये खर्च करून पाण्याचे कॅन घेतले जातात.मात्र, मनपाचे दोन महिन्याचे पाण्याचे बील का भरले जात नाही, हा प्रश्न उपस्थित होतो.
मोबाईल रिचार्ज वेळेवर,पाणीबील ठेव बाजूला
पाणीपुरवठा विभागाची सर्वाधिक थकबाकी सरकारी कार्यालय आणि झोपडपट्टीमधील आहे. झोपडपट्टीतील नागरिक मोबाईल आणि टिव्ही रिचार्ज करण्यासाठी पैसे खर्च करतात.मात्र,महापालिकेची पाणीपट्टी भरत नाहीत.ही मानसिकता आता बदलली पाहिजे.
वर्ष वसुलीचे उद्दिष्ट वसुली
2022 515 कोटी 300 कोटी
2021 472 कोटी 380 कोटी 70 लाख
2020 431 कोटी 307 कोटी
टिप -पुढील चौकट जागा असल्यास वापरणे
2021-22 ची वसुलीची स्थिती
विभाग टार्गेट वसुली
घरफाळा 114 कोटी 46 कोटी
पाणीपुरवठा ा†वभाग 73.31 कोटी 45 कोटी
Previous ArticleLTTE प्रमुख प्रभाकरन जिवंत; तमिळ नेत्याचा दावा
Next Article करुळ घाटाची दुर्दशा, वाहनधारकांचा जीव मुठीत









