कोल्हापूर :
जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यम स्वऊपाचा पाऊस सुऊ आहे. बुधवारी दिवसभर कोल्हापूर शहरासह जिह्यात पावसाची रिपरिप सुऊ होती. त्यामुळे दुपारी चारपासून रात्री आठपर्यंत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दीडफुटाने वाढ झाली. तर जिह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
दोन-तीन दिवसांपासून पावसाची संपूर्ण जिह्यात उघडझाप होती. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी इंचा-इंचाने कमी कमी होऊ लागली होती. बंधारावरील पाणी ओसऊ लागले होते, असे असताना बुधवारी पहाटेपासून पावसाची जिह्यात रिपरिप सुऊ झाली. दुपारी चारपासून पुन्हा नद्यांच्या पाणी पातळी वाढ होऊ लागली. चार तासाच्या कालावधीत पंचगंगा नदीची पाणी पातळी दीडफुटाने वाढली. जिह्यातील लघू व मध्यम प्रकल्पाचे आठ धरणे शंभर टक्के भरली. असाच पाऊस सुऊ राहिला, तर अन्य धरणे देखील लवकरच भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.








