जलाशय परिसरात पावसाचा जोर कायम : मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने टंचाई नाही
वार्ताहर/तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात सलग पाच दिवस पावसाने जोर कायम ठेवला आहे. शनिवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2454.40 फूट इतकी नोंद झाली आहे. जलाशयात आठ फूट शहराला पुरवठा करण्यासाठीचा पाणीसाठा उपलब्ध आहे. मागीलवर्षी याचदिवशी पाणीपातळी 2454.65 फूट इतकी होती. दि. 20 मे रोजी नोंद झालेल्या 2454.40 फूट पाणीपातळीत कोणताच फरक पडला नसल्याने सलग पाच दिवस पाणीपातळी स्थिर आहे. रोज 0.20 पाईपने पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचा विचार करता एक फूट पाणीपातळी वाढ होणे अपेक्षीत होते. पण ते पाणी शहराला पुरवण्यात आले आहे. या परिसरात मागील चार दिवसांत 120.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण 191.3 मि.मी. पाऊस झाला आहे. यावर्षी जलाशयात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने बेळगाव शहराला पाणीटंचाईची समस्या जाणवली नाही.










