कोल्हापूरः
जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या काळम्मावाडी (दूधगंगा) धरणातून पाणी गळती वाढली आहे. प्रतिसेकंद 350 लिटर वरून 700ते 800 मीटर पाण्याची गळती सुरू असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यातील राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल आणि भुदरगड तालुक्यांतील १२१ गावांमधील ४६ हजार ९४८ हेक्टर क्षेत्राला काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा होतो.
काळम्मावाडी धरणाची २५.३९ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. ही गळती काढण्यासाठी धरणाच्या काही भागात दुरुस्ती करण्यात येणार आहे. याकरिता राज्य सरकारने ८० कोटी रुपयांचा निधी ऑक्टोबर २०२३ मध्येच मंजूर केला. निधी मंजूर मात्र निविदा प्रक्रिया झाली नसल्यामुळे काम थांबून असल्याचेही सांगण्यात आले.








