तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
बेळगाव : खडेबाजार-गणपत गल्ली चौकामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईप फुटून शेकडो लीटर पाणी वाया जात आहे. त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील व्यावसायिकांबरोबरच नागरिकांतून होत आहे. पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना बऱ्याचवेळा करावा लागत आहे. मात्र अशा प्रकारे पाईप फुटून शहरामध्ये काही ठिकाणी पाणी वाया जात आहे. त्याची दुरुस्ती करण्याकडे पाणीपुरवठा मंडळ आणि एलअॅण्डटी कंपनीने दुर्लक्ष केले आहे. गेल्या काही दिवसांपासून खडेबाजार येथील या चौकाजवळ पाणी वाया जात आहे. त्यामुळे रस्ताही खराब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तेव्हा तातडीने महापालिकेने याकडे लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









