व्हॉल्व्हमधून शेकडो लिटर पाणी वाया : जलवाहिनी दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
एसपीएम रोडवरील शिवाजी उद्यानासमोर जलवाहिनीला गळती लागली आहे. या गळतीमुळे जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे ही पाण्याची गळती थांबवावी व पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा, अशी मागणी होत आहे.
शहराच्या अनेक भागात जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी वाया जात आहे. एल ऍण्ड टी कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने पाण्याचा अपव्यय सुरू आहे. नागरिकांनी कळवून देखील त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शिवाजी उद्यानसमोर पाणी वाया जात असून त्यातून ये-जा करणाऱया वाहनांमुळे पाणी नागरिकांवर उडत आहे. यामुळे वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. त्यामुळे ही गळती काढावी, अशी मागणी केली जात आहे.









