सातारा :
सातारा शहरातील पश्चिम भागातील व मध्य भागात शहापूर योजनेचे पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु ही योजनाच महागडी असल्याने आणि कासचे पाणी मिळावे अशी मागणी होत असल्याने कासच्या नव्या जलवाहिनीद्वारे कासच्या पाईपलाईनमधून पाणी देण्यात येणार आहे. त्याकरता पाईपलाईन टाकण्याचे काम वेगाने सुरु आहे. पाईपलाईन जोडणी झाल्यानंतर शहापूरच्या नळांना कासचे पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे मुबलक पाणी मिळणार विजेची बचत होणार आहे. स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे.
सातारा शहराला चार पाच ठिकाणाहून पाणी पुरवठा करण्यात येतो. कास, शहापूर, कण्हेर, कृष्णा नदी आणि महादरे तळे. त्यात नव्याने कासच्या वाढीव पाईपलाईनचे काम सुरु आहे. तर सगळ्यात महागडी योजना म्हणून शहापूर योजना ओळखली जाते. ही योजना आजपर्यंत नेहमीच चर्चेत राहिली आहे. कधी गळती तर कधी पंप हाऊसमध्ये बिघाड अशा समस्या भेडसावत असतात. त्यामुळे मेंटनेसचा खर्च ज्यादा असल्याकारणाने खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे या दोन्ही नेत्यांनी सातारा नगरपालिकेच्यावतीने वाढीव पाणी पुरवठ्याची कासची पाईपलाईन शहापूरच्या पाईपलाईनला जोडण्यास सूचना दिल्या. त्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.
शहापूरच्या माध्यमातून 11 टीएमसी पाणी पुरवठा सुमारे 10 हजार नळ कनेक्शनद्वारे करण्यात येतो. त्या सर्व नळकनेकशनधारकांना कासचे पाणी देण्याकरता नव्याने पॉवर हॉऊसच्या पलिकडच्या बाजूने जकातवाडी येथील फिल्टरेशन प्लॅटंकडे पाईपलाईन जोडण्याचे काम सुरु आहे. पाईपलाईनकरता खोदाई केली जात असून तेथील मुरुम हा उचलून सोनगाव कचरा डेपोत टाकण्यात येत आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील सुमारे दहा हजार नळ कनेक्शनधारकांना मुबलक पाणी मिळणार आहे.
- लवकरच काम पूर्ण होणार
पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण होईल. मुबलक पाणी मिळणार आहे. काम चांगल्या दर्जाचे सुरु आहे. पाईपलाईनच्या कामादरम्यान काढलेले गौणखनिज रितसर परवानगीने सोनगाव कचरा डेपोत नेवून टाकले जात आहे.
-शहाजी वाठारे, अभियंता








