येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे कार्यकर्ते सक्रिय
प्रतिनिधी / बेळगाव
राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक रविवार दि. 19 मार्च रोजी घालण्यात येणार आहे. याचबरोबर या मूर्तीला जलअर्पणही करण्यात येणार असून महाराष्ट्राबरोबरच इतर नद्यांमधील पाणी आणण्यासाठी म. ए. समितीचे कार्यकर्ते रवाना झाले आहेत. ते जल घेऊन बेळगावकडे येत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला 7 नद्यांच्या पाण्याचे जलार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कोल्हापूर येथील पंचगंगा नदीला गेले. त्या ठिकाणी जलपूजन करून पाणी घेण्यात आले. त्यानंतर नरसोबावाडी येथील पंचगंगा, वारणा आणि कृष्णा नदीच्या तिहेरी संगामातील जल घेण्यात आले आहे.
आता खानापूर येथील नदीचे पाणी आणले जाणार आहे. हे जल आणण्यासाठी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सरचिटणीस प्रकाश अष्टेकर, उपाध्यक्ष राजू पावले, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, दत्ता उघाडे गेले होते. ते रात्री उशिराने परतले आहेत.









