किणे वार्ताहर
वाटंगीचे उद्योजक रोहन देसाई यांचा कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, वाटंगी व आजरा परिसरात शोककळा पसरली आहे.
आजरा गडहिंग्लज मार्गावर सोमवारी दुपारी झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात वाटंगीचे उद्योजक रोहन देसाई गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
व्यंकटराव हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका सौ वृशाली देसाई व सदानंद देसाई यांचा रोहन हा मुलगा असून अगदी कमी वयात उद्योग व्यवसायात यशस्वी झालेल्या रोहन देसाई यांच्या जाण्याने वाटंगी व आजरा परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









