प्रतिनिधी /पर्वरी
येथील ओ कोकेरो सर्कलजवळ गेले दोन दिवस झाले पाण्याचे पाईप फुटून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाणी पुरवठा कार्यालयात अनेक तक्रारी करून सुद्धा कोणीच दखल घेत नाही. पाणी पुरवठा खात्याने लवकरात लवकर जलवाहिनी दुरुस्त करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
पाईप फुटलेल्या जागेपासून पन्नास फुट अंतरावर पाण्याची टाकी असून तेथे अनेक कामगार असून कोणीच दुरुस्त करण्याची तसदी घेत नाही. पर्वरीतील ग्रामस्थाना सतत पाणी टंचाईला सामाना करावा लागत असल्याने पाणी जपून वापरतात. त्यात अशी पाण्याची नासाडी झाली तर ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी स्थिती होईल. त्यासाठी संबंधित खात्याने पाईप लवकरात लवकर दुरुस्त करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.









