अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमधील गुन्हेगारीवरून खळबळजनक दावे केले. हे शहर जगातील सर्वाधिक हत्या प्रमाण असलेल्या शहरांपैकी एक आहे. वॉशिंग्टन डीसीची स्थिती अनेक कुख्यात हिंसक देशांपेक्षाही वाईट आहे. परंतु आता डीसी संघीय नियंत्रणात आले आहे, येथे आता कायद्याचे राज्य असेल, व्हाइट हाउसचे याचे प्रभारी आहे. सैन्य आणि पोलीस या शहराला गुन्हेगारीपासून मुक्त करवतील आणि याला पुन्हा सुरक्षित, स्वच्छ, वास्तव्ययोग्य आणि सुंदर करतील असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
वॉशिंग्टन डीसी मेट्रोपॉलिटन पोलीस विभागावर संघीय नियंत्रण येणार असल्याचे त्यांनी सोमवारी जाहीर केले होते. शहरात नॅशनल गार्ड तैनात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरातील हत्यांचे प्रमाण मेक्सिको सिटी, बोगोटा, इस्लामाबाद आणि अदीस अबाबा यासारख्या हिंसेसाठी कुख्यात ठिकाणांपेक्षाही अधिक असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक केली जात नाही. भीतीपोटी नागरिकांनी पोलिसांना फोन करणे जवळपास बंद पेले आणि अंधार पडल्यावर रस्त्यांवर न जाण्याचा पर्याय नागरिकांनी निवडल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.
शहर प्रशासनावर निष्क्रीय
एका प्रीसिंक्ट कमांडरला गुन्ह्यांच्या आकडेवारीत फेरफार करण्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. वास्तविक आकडे याहून अधिक असल्याचे डीसी पोलीस युनियनचेही सांगणे आहे. डीसीच्या डेमोक्रेट प्रशासनाने बहुतांश गुन्ह्यांचा तपास, अटक आणि खटले चालविणे जवळपास बंद केल्याने प्रकाशित आकडेवारी वास्तविक हिंसेचा एक अंशही दर्शवित नसल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
नागरिक त्रस्त
शहरात गुन्हे अधिक क्रूर होत गेले आहेत. डीसीमध्ये हत्येचे प्रमाण जवळपास एक दशकात दुप्पट झाले आहे, परंतु ही केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेली अधिकृत आकडेवारी आहे. प्रत्यक्ष आकडेवारी याहून अधिक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.









