पावसाळा सुरु झाला की सर्व गृहिणींना पावसाळ्यात साखर आणि मीठात ओलावा येण्याची समस्या जाणवू लागते. यामुळे साखरेत मुंग्याही येऊ लागतात. त्यामुळे साखर वापरता येत नाही. यापासून वाचण्यासाठी तुम्ही हे काही उपाय करू शकता.
साखरेला ओलावापासून वाचवण्यासाठी साखरेच्या डब्यात ६-७ लवंगा कपड्यात बांधून ठेवा. असे केल्याने पावसाळ्यात ओलाव्यामुळे साखर खराब होणार नाही.
ज्या डब्यात तुम्ही साखर ठेवत आहात त्यात दालचिनीचे काही तुकडे ठेवा. असे केल्याने केवळ साखरच नाही तर गोड पदार्थांची चवही वाढेल.
पावसाळा सुरू होताच काचेच्या बरणीत साखर ठेवायला सुरुवात करा.
साखर घेताना नेहमी कोरडा चमचा वापरा.
कोणत्याही भांड्यात साखर किंवा मीठ भरण्यापूर्वी त्यात तांदळाचे काही दाणे कापडात बांधून ठेवा. हे तांदूळ साखर आणि मीठ मध्ये असलेला अतिरिक्त ओलावा शोषून घेते आणि पूर्णपणे कोरडे ठेवण्यासाठी मदत करेल.