प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Weather Update : कोल्हापूर शहरासह जिह्याच्या काही भागात बुधवारपासून शुक्रवारपर्यंत (15 ते 17 मार्च) वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजानुसार बुधवारी गारगोटीसह जिह्याच्या अन्य भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पुढील तीन दिवस ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून शनिवारी देखील हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढत आहे. बुधवारी सकाळपासूनच जिह्यात काही अंशी ढगाळ वातावरण होते. दुपारी चारनंतर वातावरण पूर्णपणे ढगाळ होत गेले. याच दरम्यान गारगोटीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुढील तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. उद्यापासून तीन दिवस जोरदार वारे आणि विजेच्या कडकडाटासह दुपारनंतर पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरीकांनी या कालावधीत घराबाहेर पडताना दक्षता घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









