बदली होऊन लडाखला न जाण्याचे प्रकरण
पणजी : गोव्याचे आयएएस अधिकारी संजित रॉड्रिग्स गोवा राज्यातून बदली होऊन लडाखला जाण्यास तयार नाहीत असे एकंदरीत चित्र दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने रॉड्रिग्स यांना लडाख येथे बदलीच्या ठिकाणी तातडीने रूजू होण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र त्यांना गोव्यातील सेवेतून मुक्त करण्यास सध्या तरी सरकारची तयारी दिसत नाही. त्यांना मुक्त केल्याशिवाय ते लडाखला जाऊ शकत नाहीत. बदलीच्या आदेशाचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तसेच बढती रोखण्यात येईल असे रॉड्रिग्स यांना आदेशातून बजावण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या लडाखच्या बदलीचा आदेश नोव्हेंबर 2024 मध्ये जारी करण्यात आला होता. तेव्हा बदली रोखण्यात ते यशस्वी झाले होते. आताही त्याच ठिकाणी बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे.









