वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिग क्रिकेट स्पर्धेसाठी सिडनी थंडरने सलामीचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरबरोबर दोन वर्षांसाठी नुकताच नवा करार केला आहे.
सिडनी थंडर आणि वॉर्नर यांच्यातील हा करार शनिवारी झाला. डेविड वॉर्नर तिसऱयांदा सिडनी थंडरशी करारबद्ध झाला आहे. वॉर्नरने यापूर्वी दोनवेळा सिडनी थंडरबरोबर या स्पर्धेसाठी केलेल्या करारानुसार दोन सामने खेळले होते. मेलबर्न स्टार्स विरुद्धच्या सामन्यात वॉर्नरने नाबाद 102 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. डेविड वॉर्नरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 96 कसोटी, 133 वनडे आणि 91 टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे.









