वारणानगर / प्रतिनिधी
येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यास चालू गळीत हंगामामध्ये मार्च-एप्रिल या महिन्यात गाळपास येणाऱ्या ऊसाला जादा दर देणार असल्याची माहिती अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यानी दिली.
कारखान्याच्या ६६ व्या वार्षिक सभेत घोषित केलेप्रमाणे फक्त वारणा कारखाना कार्यक्षेत्रातून १ मार्च ते १५ मार्चमध्ये गाळपासाठी येणाऱ्या ऊसास १०० रुपये प्रतिटन,१६ मार्च ते ३१ मार्चमध्ये गाळपासाठी येणाऱ्या ऊसास १५० रुपये प्रतिटन,तर १ एप्रिल ते कारखाना संपेपर्यंत गाळपासाठी येणाऱ्या ऊसास २०० रुपये प्रतिटन जादा दर ऊस उत्पादकांना देणेचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेणेत आला असलेचे कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी सांगितले.
डिसेंबर २०२२ अखेर गाळपास आलेल्या ऊसाची किफायतशीर किमत (एफआरपी) प्र.मे. टनास रुपये ३०२५ याप्रमाणे संबंधित ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर जमा केली आहे. त्याचप्रमाणे तोडणी व वाहतूक कंत्राटदारांचे रक्कमही संबंधित तोडणी कंत्राटदार व वाहन मालक यांच्या खात्यावर जमा केली असलेचे कारखान्याचे अध्यक्ष विनय कोरे यांनी सांगून कारखान्याच्या गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने गळीत करत असून कारखान्याची तांत्रिक कार्यक्षमता अतिशय चांगली मिळत आहे.
कारखान्याने आज अखेर ७,४५,०४० मे.टन ऊसाचे गाळप केलेले असून या गळीत हंगामात कारखान्यास आजअखेर सरासरी साखर उतारा ११.९९ टक्के इतका आलेला आहे. कारखान्याचा वीज निर्मिती प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालू असून या वीज प्रकल्पातून कारखान्याने आजअखेर ४,६१,८४,५०० युनिटस् वीज महावितरण कंपनीस निर्यात केलेली आहे. तसेच कारखान्याच्या आजवरच्या इतिहासात डिस्टीलरीमध्ये ५९,०६,१८२ लाख लिटर्स इथेनॉलचे उत्पादन केलेले आहे असे सांगीतले.
कारखान्याने चालू गळीत हंगामात १६,००,००० मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केलेले असलेने सर्व ऊस उत्पादक सभासद,वाहतूकदार मालक व कारखान्याचे कामगार यांनी सहकार्य करुन सर्व ऊस आपल्या वारणा कारखान्याला द्यावा व कारखान्याचे १६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेस सहकार्य करावे असे आवाहन वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील व कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजीराव भगत यांनी केले.या बैठकीस कारखान्याचे सर्व संचालक,अधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









