स्क्रॅप जळून नुकसान
बेळगाव : स्क्रॅप गोडावूनला आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास कॅम्प येथे घडली. शांतेशा मोटर्सच्या स्क्रॅप गोडावूनमध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये स्पेअरपार्ट्स व स्क्रॅपमधील साहित्याचे नुकसान झाले. अंदाजे 10 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. बेळगाव दक्षिण वाहतूक पोलीस स्थानकाशेजारी असणाऱ्या शांतेशा मोटर्सच्या स्क्रॅप गोडावूनला सोमवारी आग लागली. स्पंज, फोम यासह इतर स्क्रॅप साहित्य असल्यामुळे काहीवेळातच आगीने जोर धरला. स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन विभागाला कळविली. तात्काळ घटनास्थळी पोहोचत अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाचे ठाणा अधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. यामध्ये स्क्रॅपच्या साहित्याचे नुकसान झाले.









