उन्हाळ्यात उष्णता इतके असते की अनेक आउटफिट्स घालता येत नाही.त्याचबरोबर आपल्याला हवी ती फॅशन ही करता येत नाही.इतकाच नाही तर चुकीचे कपडे घातल्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवरदेखील दिसून येतो. पण जर तुम्हाला या उन्हळ्यात स्टायलिश दिसायचं आहे;ते ही अगदी कंफर्टेबल कपड्यांमध्ये! मग खालील टिप्स फॉलो करा आणि कूल लूक मिळवा. उन्हाळ्यात कूल लूकसाठी काय करावे हे आज आपण जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात आपल्या वॉर्डरोबमध्ये पांढऱ्या रंगाचे आउटफिट ठेवायला विसरू नका.पंधरा रंग जास्त उष्णता शोषून घेत नाही. त्यामुळे पांढरा शॉर्ट ड्रेस, मॅक्सी ड्रेस, लखनवी सूट, अनारकली, शर्ट, ट्राऊजर, साडी काहीही घाला, कूलच दिसाल.
उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंटला अधिक पसंती दिली जाते. फिक्या रंगांवर फ्लोरल प्रिंट खुलून तर दिसेच शिवाय ते डोळ्यांना एक थंडावा देते. फ्लोरल प्रमाणेच चेक्स, स्ट्राइप्स, ज्यॉमेट्रीक प्रिंट्स पण सध्या ट्रेण्ड मध्ये आहेत.
उन्हाळ्यात कपड्यांची निवड करताना कंफर्टेबलचा विशेष विचार करा. गरमीमुळे घाम जास्त येतो आणि त्यामुळे टाईट फिटींगवाले कपडे शक्यतो टाळा. शॉर्ट ड्रेस, मॅक्सी ड्रेस, कॉटन टी-शर्ट, प्लाजो, लाँग कुर्ती, प्लेटेड स्कर्ट, लिनेने शर्ट, सिमिट्रिकल टॉप, कॉटन साडी हे उत्तम पर्याय आहेत.
उन्हाळ्यात जर इव्हनिंग पार्टी असेल तर शिफॉन, जॉर्जेट, रॉ सिल्क मध्ये वन शोल्डर, ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस किंवा मॅक्सी ड्रेस घालता येईल.जेणेकरून तुम्हाला जास्त गरम ही होणार नाही.
सुट्ट्या असल्यामुळे उन्हाळ्यात लग्नसमारंभ ठरलेले असतात. पण यावेळी लग्नांमध्ये भारी वर्क असलेले, डार्क रंगातील ड्रेस थोडे त्रासदायक होऊ शकतात.अशावेळी पेस्टल कलरमधील अनारकली ड्रेस, लेहंगा, ट्रेडिशनल गाऊन, साडी नेसता येईल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









