उन्हाळ्यात उष्णतेमुळे अनेक लोकांना घामोळ्यांचा त्रास होतो. घामोळ्यांमुळे सतत खाज आणि शरीरावर लाल चट्टे सुद्धा पडतात. अशावेळी काही घरगुती उपाय केले तर या समस्येपासून सुटका होऊ शकते.हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात.
उन्हाळ्यात उन्हाच्या दाहकतेमुळे संपूर्ण शरीर घामाने भरून जाते. शरीर थंड ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा आंघोळ करा. तुम्हाला दिसेल की घामोळ्या खूप कमी झाले आहेत.
आंघोळीच्या वेळी इसेंशियल ऑइल वापरा. हे ऑइल शरीरातील खाज काढून टाकण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा रुमालाला थोडे तेल लावा. तुम्हाला खूप घाम येत असेल तर त्या रुमालाने तुमची मान आणि चेहरा पुसून घ्या.
ज्या भागात घामोळे उठलेत तिथं बर्फ लावा. त्यामुळे शरीराचा तो भाग थंड होईल. परिणामी खाज येण्याची समस्या कमी होईल.
हवामानात आंघोळ करताना साबण किंवा बॉडी वॉश वापरा. तेल लावणे टाळा. तुम्हाला तेलाची एलर्जी असल्यास, खाज वाढेल.
ज्या भागात घाम साचतो त्या भागात घामोळ्या येण्याची शक्यता असते. त्यामुळे आंघोळीच्या वेळी अंडरआर्म्स, थाई फोल्ड, मांडीचा सांधा, स्तनाच्या खाली नीट स्वच्छ करा.
Previous ArticleRaju Shetty : अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार; राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना कळवले पत्राद्वारे
Next Article दादा भुसे, राहुल कुल यांच्यावर कारवाई का नाही?









