धामोड / वार्ताहर
धामोड ( ता . राधानगरी ) येथे वादळी वारा व मुसळधार पावसामुळे चंद्राबाई मारुती पाटील यांच्या दुमजली घराची भिंत कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हि घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली मात्र कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील तुळशी खोऱ्यात गेल्या आठ – दहा दिवसापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे . मंगळवारी दिवसभरात १०८ मि . मि . पावसाची नोंद झाली आहे . मुसळधार पावसाने व वादळी वार्याने दुमजली घराची भिंत ओली होऊन रात्रीच्या सुमारास कोसळली . यामुळे चंद्राबाई पाटील यांचे प्रापंचिक साहीत्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . नुकसानीची पहाणी धामोडचे उपसरपंच मारुती तामकर , ग्रा.पं. सदस्य एन . जी . नलवडे, पोलिसपाटील महादेव फडके , तलाठी दिनकर जाधव, ग्रामसेवक संतोष गुरव , कृषी सहाय्यक उमेश नाधवडेकर यांनी केली .