सातारा : वाई ते सातारा जाणाऱ्या एसटी बसचा आणि गॅसचा ट्रक यांच्यामध्ये दुपारी बावधन ओढ्यानजिक अपघात झाला. अपघातातील जखमींना तात्काळ वाई येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी वाई पोलीस आणि वाईचे आगारप्रमुख गणेश कोळी यांनी भेट दिली. अपघाताची माहिती त्यांनी घेतली. या अपघातात १८ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
साताऱ्याहून वाईला निघालेली एसटी बस आणि वाईहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या गॅसचा ट्रक यांचा अपघात बावधन ओढ्यानजिक झाला. अपघात झाल्यानंतर बसचा चालकासह बसमधील प्रवाशी जखमी झाले असून त्यांना लगेच वाई येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. या अपघाताची माहिती वाई पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. तसेच वाईचे आगारप्रमुख गणेश कोळी हेही घटनास्थळी पोहचले. त्यांनी या घटनेची माहिती घेतली.
दरम्यान, जखमींना उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णालयातही त्यांनी भेट देवून जखमी प्रवाशी व चालकाची चौकशी त्यांनी केली. या अपघाताची नोंद उशीरापर्यंत वाई पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









