काही कळायच्या आताच तिथे फिल्मी स्टाईलने हाणामारी सुरू
सातारा : वाई तालुक्यातील बावधन नाका हे ठिकाण अलीकडच्या काळात भांडण, मारामाऱ्या यासाठी चर्चेत येऊ लागले आहे. सोमवारी रात्री 9 वाजता भर पावसात काही युवक बावधन नाका परिसरात जमले. काही कळायच्या आताच तिथे फिल्मी स्टाईलने हाणामारी सुरू झाली.
रस्त्यावर दोन्ही बाजूची वाहतूक थांबली होती. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ऑन दि स्पॉट पोहचले. तो पर्यंत रस्त्यावर मध्येच पाडून फायटिंग सुरू झाल्याने बावधन नाका म्हणजे बीड बनलाय का? असा सवाल समस्त वाईकरांना पडू लागला आहे.
घडलेली घटना अशी, वाई येथील बावधन नाका परिसरात सोमवारी रात्री 9 वाजता काही युवक मोठ्या संख्येने जमले होते. काहीतरी घटना घडणार असे कळायच्या आतच त्यात आणखी काही युवक मिसळले आणि मारामारी सुरू झाली. जोरावर मारामारी सुरू झाल्याने वाई स्टँडकडे जाणारी आणि वाईकडून सह्याद्रीनगरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.
फ्री स्टाईल हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढली. पावसातही फायटिंग सुरू असताना बघ्यातील कोणीतरी वाई पोलिसांशी संपर्क केला. दरम्यान, पोलिसांची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहचली. वाई पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. हाणामारी थांबली. मात्र, या प्रकारामुळे वाईचा बावधन नाका पुन्हा चर्चेत आला.
नेमकी भांडण करणारी कोण होती?, भांडण कशावरून झाली?, बावधन नाका वाईचा बीड होतोय की काय?, अशी बघ्यांमध्ये चर्चा सुरू होती. यापूर्वी ही अनेक घटना बावधन नाका परिसरात घडल्या होत्या. त्यावरून वाईकरांनी मोर्चा ही काढला होता. परंतु पुन्हा काही दिवसांनी बावधन नाक्यावर फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याच्या घटनेन हा नाका चर्चेत आला आहे.








