चोरे :
पावसामुळे या भागातील महत्त्वाचा वाघजाई पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, वाघजाई दऱ्यातील पूर्ण परिसर हिवरवळीने नटला आहे.
चोरे गावच्या पश्चिम दक्षिण भागात तिन्ही बाजूला डोंगर असणाऱ्या ठिकाणी हा तलाव आहे. पन्नास वर्षांपूर्वी हा तलाव बांधण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून या तलावला गळती आहे. तरीही एकदा भरल्यानंतर दिवाळीपर्यंत यातील पाणी टिकते. जुलै-ऑगस्टच्या दरम्यान हा तलाव भरत असतो.
या तलावाच्या खालच्या बाजूने चोरेचा गाव ओढा वाहतो. या ओढ्याला तलावातील पाझर व वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे ओढा डिसेंबर-जानेवारीपर्यंत वाहता राहतो. या तलावात पाणीसाठा पूर्ण झाल्याने शेतीला व जनावरांना फायदा होत असतो.
डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे. तीन ते चार बाजूने डोंगरातून पाणी आल्यामुळे हा तलाव पूर्ण भरला आहे. सध्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र यांना या पाण्याचा लाभ होतो
या भागातील महत्त्वाचा पाण्याचा स्रोत हा पाझर तलाव आहे. गळती नसती तर पाच-सहा महिने पाणी पुरले असते. मुबलक पावसामुळे तलाव लवकर भरतो. तलावातून खालच्या भागात भरपूर पाणी वाहून जाते. ओढ्यातून अनेक शेतकरी पाणी शेतीला देत असतात. या तलावाच्या खाली एमआय टँकची गरज आहे. तो व्हावा, अशी लोकांची मागणी असल्याचे महिपती पालेकर यांनी सांगिलते.








