वृत्तसंस्था/ रोम
इटलीचा पुरूष टेनिसपटू जेनिक सिनेर याच्या उत्तेजक प्रकरणी विश्व उत्तेजकविरोधी एजन्सीने (वाडा)ने अपील केल्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. इटलीच्या टॉपसिडेड जेनिक सिनेर यांने अलिकडेच अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे. उत्तेजकप्रकरणी सिनेरवर एक किंवा दोन वर्षांची बंदी घालण्यासाठी वाडाचे प्रयत्न चालू आहेत. सिनेर सध्या बिजिंगमध्ये चालू असलेल्या चीन खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत खेळत आहे. गेल्या मार्चमध्ये सिनेरची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती आणि त्यामध्ये तो दोन वेळेला दोषी आढळला होता. पण त्याच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रेटी एजन्सीने नियुक्त केलेल्या स्वतंत्र लवादाने सिनेरवर बंदी घालण्यात आली नाही. स्वित्झर्लंडमधील क्रीडा लवादाच्या न्यायालयात वाडाकडून याप्रकरणी अपील करण्यात आले आहे.









