इचलकरंजी :
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा लक्ष्मण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. कॅबिनेटची मान्यता मिळून 25 करोडचा फंडही मिळाला. त्यातून वराड समाजाच्या युवकांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसाहाय्य मिळणार आहे. तर वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळातून वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना पदवी व उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दातृत्व स्वीकारून वडार समाजाला न्याय दिला आहे. आता धैर्यशील माने यांना निवडून देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करूया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 400 पारचे स्वप्न पूर्ण करूयात, असे आवाहन मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी केले.
महाराष्ट्र बुलंद दिसतोय तो कष्टकरी कामगार आणि गोरगरिबांच्या हातामुळे. त्यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र शासन करीत आहे वडार समाजातील नव्या पिढीला नवा उद्योग व्यवसाय व शिक्षण करावे यासाठी पहिल्यांदाच महामंडळ स्थापन करून न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आणि मी यापुढे वडार समाजाचा नव्या पिढीला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
प्रास्ताविकात माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी विजय चौगुले यांच्यामुळे आज वडार समाज एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्र शासनात वडार समाजाचा एक हक्काचा माणूस म्हणून विजय चौगुले आहेत. त्यांच्या माध्यमातून वडार समाजाच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम आम्ही संघटनेचे पदाधिकारी करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या संघटनेला बळ दिले आहे. त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया असे सांगितले.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, अशोकराव स्वामी, मिश्रीलाल जाजू, अजितमामा जाधव, पै. अमृत भोसले, अर्जुन देशमुख, मारुती पाथरवट आदींनी मनोगत व्यक्त केले.