बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) लवकरच इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांतर्गत अन्य 12 ते 15 शाखा सुरू करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे या शाखांच्या अभ्यासासाठी ठराविक प्रदेशाचे बंधन असणार नाही. तर जगभरातील विद्यार्थी हा अभ्यासक्रम करू शकतात हे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमापूर्वी अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळाने (एआयटीई) त्याचा पूर्ण अभ्यास केला आहे. व्हिटीयुने पाठवून दिलेल्या तपशीलावरही मंडळाचा अभ्यास सुरू आहे. एकदाका तंत्र शिक्षण मंडळाने हिरवा कंदील दाखविला तर हा अभ्यास लवकरच सुरू केला जाईल, असे कुलगुरू विद्याशंकर यांनी सांगितले. या अभ्यासक्रमासाठीची सर्व पुस्तके ऑनलाईन उपलब्ध असतील. शिवाय प्राध्यापकांचे भाषण (लेक्चर) सुद्धा अपलोड केले जाईल. अन्य विद्यापीठांच्या तुलनेने या अभ्यासक्रमांची फी कमी असणार आहे. अभ्यासाच्या गरजेनुसार विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे ऑनलाईन संभाषणही होवू शकणार आहे, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले. दरम्यान ज्या 51 विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे दाखवून इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला त्याची छाननी सुरू आहे. विद्यापीठाने क्युआरकोड स्कॅन करताच त्याची लिंक असल्याचे व बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचा प्रवेश रद्दबातल ठरविण्यात आला आहे. यामुळे यापूर्वीच्या 3 वर्षांच्या प्रवेश दाखल्यांची विद्यापीठ पडताळणी करणार आहे. प्रवेश घेतलेल्या त्या कॉलेजनाही नोटीस तसेच या विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्या कॉलेजनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रमाणपत्र आढळून आल्यास त्यांना मिळालेली पदवीसुद्धा रद्द करण्यात येईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
Previous Articleजोय आलुक्कासची सर्वांत मोठ्या दागिने महोत्सवाची घोषणा
Next Article सी टनेल अॅक्वारियम प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








