व्हीटीयू चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : जीआयटी तांत्रीक महाविद्यालय आयोजीत व्हीटीयू बेळगाव विभागीय क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन सामन्यात व्हीटीयू, जैन बैळगाव, केएलई चिकोडी, जीआयटी संघानी आपल्या प्रतिस्पर्धावर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. पियुश पठाडे, संतोष, कल्पेश संभोजी, झिनत एबीएम याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. जीआयटी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसजीबीआरटीके प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडीबाद 137 धावा केल्या. त्यात उतमने 7 चौकारासह 41, आकाशने 18 धावा केल्या. व्हीटीयूतर्फे रोहित डी.ने 3 गडीबाद केले. प्रत्युतरादाखल खेळताना व्हीटीयूने 12.2 षटकात 1 गडीबाद 141 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात कल्पेशने 2 षटकार व 8 चौकारांसह 72, विनितने 4 चौकारासह 50 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात जैन बेळगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडीबाद 204 धावा केल्या. त्यात जिनत एबीएमने 2 षटकार 8 चौकारासह 69, प्रेमने 8 चौकरासह 49 धावा केल्या. केएलईतर्फे अवनीशने 3 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलईचा डाव 18.4 षटकात 107 धावात आटोपला. त्यात यशने 2 षटकार 5 चौकारासह 53, तर श्रीने 31 धावा केल्या. जैनतर्फे जिनत व निरंजन यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केला.
व्हीटीयु मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मराठा मंडळने प्रथम फलंदाजी करताना 18.2 षटकात सर्व गडीबाद 162 धावा केल्या. त्यात रामा गावडे 45, देवराज गंनगोटीने 21, रोहन भटकळने 15, संकल्प भातकांडे 19 धावा केल्या. केएलई चिकोडीतर्फे रूद्राप्पाने 35 धावात 4, कार्तिक व सुप्रेश यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलई चिकोडी संघाने 19.5 षटकात 8 गडीबाद 163 धावा करून सामना 2 गड्यांनी जिंकला. त्यात संतोष जे ने 58, महांतेशने 31, कार्तिकने 21, विकासने 12 धावा केल्या. मराठा मंडळतर्फे वेंकट व देवराज यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. दुसऱ्या सामन्यात जीआयटीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडीबाद 176 धावा केल्या. त्यात अविचन अमनगीने 5 षटकार 6 चौकारासह 76, रोशन बेकवाडकरने 53, यश हावळाण्णाचेने 24 धावा केल्या. जैन हुबळीतर्फे मदन व अमीर यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना जैन हुबळीने 20 षटकात 9 गडीबाद 145 धावाच केल्या. त्यात विकासने 39, अरबाज व अमीर यांनी प्रत्येकी 21 तर जयकृष्णाने 15 धावा केल्या. जीआयटीतर्फे पियुष पठाडेने 14 धावात 4, इरफान लोनेने 3, यश हावळण्णाचेने 2 गडीबाद केल्या.









