वार्ताहर /शिवोली
शिवोलीत प्रसिद्ध असलेले डॉ. दत्ता रामनाथ नायक 97 (नायक दोतोर) यांचे रविवार दि. 22 रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले व त्याच दिवशी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. नायक यांचा परिवार डॉक्टीरी पेशात असून त्यांनी रुग्णांची निस्वार्थपणे सेवा केली. त्यांनी आपल्या घरातच लहानसा ‘क्लिनिक’ उघडून तेथे रुग्णांना उपचार देण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातगुणातून उपचार मिळावा म्हणून शेजारी राज्यातील रुग्णसुद्धा पहाटे चार ते पाच वाजता नंबर मिळविण्यासाठी त्यांच्या क्लिनिकवर येत होते.
तीन पिढी डॉक्टरकी पेशात
डॉ. दत्ता नायक यांच्या घराण्याला डॉक्टरकी पेशा लाभलेला आहे. नायक यांचे वडील कै. डॉ. रामनाथ नायक व त्यांचा मुलगा डॉ. गुरुप्रसाद नायक अशा तीन पीढय़ांपासून जनतेच्या सेवेत आहेत त्यामुळे येथील लोकांमध्ये त्यांच्या घराण्यात आपुलकी निर्माण झालेली आहे.
नायक दोतोर यांचे शिक्षण श्री. गुंडू आमोणकर यांनी चालविलेली शाळा ऍग्लो पोर्तुगीज इंस्टाटय़ूट मध्ये मेटःाrक ते पुढील कालेज आणि वैद्यकीय शिक्षण पुण्यामध्ये झाले. डॉक्टरची पद्वी लाभल्यावर त्यांनी मुंबईला जाऊन ’बॉम्बे हॉस्पिटल‘ मरीन लाईन्स येथे रेजीडंट पेथोलॉजिस्ट म्हणून तीन वर्षे काम केले. नंतर गोव्यातील जनतेची सेवा करावी ह्या हेतूने त्यांनी गोव्यात (शिवोली) येथे येऊन आपल्या निवासस्थानी ‘वामन स्मृती’ येथे क्लिनिक सुरु करुन रुग्णांना रात्री-अपरात्री सेवा देण्यास सुरु केली. तसेच 1965 ते 1990 पर्यंत त्यांनी म्हापसा येथे वैद्यकीय क्षेत्रात रूग्णांची सेवा सतत केली.
‘दोतोर नायक’ यांनी वयाच्या 93 व्या वर्षीसुद्धा रुग्णांची सेवा केली व त्यांचा मुलगा डॉ. गुरुप्रसाद नायक कार्डीयोलॉजिस्ट असून नायक घराण्याचा डॉक्टरकी पेशातील वारसा पुढे नेत आहे. दोतोर नायक यांच्या निधनाची वार्ता पसरताच अनेक डॉक्टर, नातेवाईक, आप्तेष्ट, राजकीय नेते, शिवोलीतील नागरिक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंतीम दर्शन घेतले.
त्यांच्या पश्चात पत्नी ः सुनिता दत्ता नायक, पुत्र ः गुरुप्रसाद नायक, सुन ः मिता गुरुप्रसाद नायक, कन्या ः पौर्णिमा उपेंद्र हेगडे, बीना गुरुदास कामत शंखवाळकर, प्रणाली सिद्धेश गावणेकर, नातवंडे असा परिवार आहे.









