बलात्काराच्या गुन्हेगारांना स्वीमिंग पूलमध्ये मृत्यूदंड
दक्षिण अमेरिकन देश बोलिवियामध्ये जगातील सर्वात खराब तुरुंग आहे. हा तुरुंग देशाची राजधानी ला पाज मध्ये असून याचे नाव सॅन पेड्रो जेल आहे. या तुरुंगात कुठलाच सुरक्षारक्षक तैनात नसून कैदीच हा तुरुंग चालवितात. तसेच ते स्वत:चा न्यायनिवाडा देखील करतात. सध्या या तुरुंगात सुमारे 3 हजार कैदी आहेत.

काही प्रकरणांमध्ये गुन्हेगारांसोबत त्यांचे कुटुंबही तुरुंगात राहते, काही प्रकरणांमध्ये कैद्यांचे कुटुंबीय बाहेर राहण्याऐवजी तुरुंगातच अधिक सुरक्षित असल्याचे मानले जाते. तुरुंगात कैद्यांची एक कौन्सिल असून ती नियम तयार करते, यात शिक्षेचेही नियम सामील आहेत.
बलात्कारी आणि मुलींची छेड काढणाऱ्यांसोबत तुरुंगात झिरो टॉलरन्सच्या धोरणासोबत वर्तन केले जाते, यात चाकूने वार करणे सामान्य शिक्षा आहे. जेव्हा एखादा लैंगिक गुन्हेगार तुरुंगात येतो, तेव्हा कैद्यांची गर्दी होते आणि त्याच्याकडून गुन्हेगाराला विजेचा झटका दिला जातो. तसेच चाकूने वार केले जातात किंवा बदडून जीव घेतला जाऊ शकतो. तुरुंगात एक भयानक स्वीमिंग पूल असून याचा वापर अनेक मृत्युदंडांसाठी करण्यात आला आहे. येथे कैदी मृत्युशय्येवरील गुन्हेगारासाठी बँड वाजवितात. या तुरुंगात कैदी स्वत:साठी कोठडी खरेदी करतात किंवा भाड्याने मिळवितात. प्रत्येकाला शून्यापासून 5.5 स्टारपर्यंत मानांकन दिले जाते. जर कुठला कैदी कोठडी खरेदी करू शकत नसल्यास त्याला स्वत:चा जीव गमवावा लागू शकतो, कारण बाहेर रक्त गोठविणारी थंडी असते. बाहेरून हे अन्य तुरुंगाप्रमाणे दिसत असले तरीही यात सलून, रेस्टॉरंट, क्लासेस, चर्च आणि अनेक छोटे व्यवसाय देखील आहेत.
तुरुंगातील कोठडीसाठी कैद्यांना काम करून भाडे भरावे लागते. तुरुंगात कैद्यांसाठी अनेक नोकऱ्या आहेत. या नोकऱ्या करून तो पैसे कमावून स्वत:च्या कोठडीचे भाडे भरू शकतो.









