भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत व भाजप पदाधिकारी यांचे कासारटाका चरणी साकडे
मालवण | प्रतिनिधी : आमदार नितेश राणे लवकर मंत्री होऊदेत तर भाजप नेते निलेश राणे आमदार होऊदेत. असे साकडे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत व भाजप पदाधिकारी यांनी मालवण येथील जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कासारटाका चरणी रविवारी घातले आहे. आता देव चरणी सेवाचाकरी दिली आहे. नितेश राणे, निलेश राणे हे मंत्री आमदार झाल्यानंतर याच ठिकाणी नवस फेडला जाईल. असे दत्ता सामंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, सुधीर वस्त, प्रशांत बिरमोळे,मंदार लुडबे, ललित चव्हाण, राजू बिडये, हेमंत चव्हाण, प्रमोद करलकर, निनाद बादेकर, भाई मांजरेकर, मंगेश पात्रे, संदीप मालंडकर, कमलाकर कोचरेकर, ओंकार लुडबे यासह अन्य उपस्थित होते.
आमदार नितेश राणे चांगले काम करत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात भाजपचे मंत्री झाले नाही. मात्र डॅशिंग युवा नेतृत्व असलेले आमदार नितेश नारायण राणे हे मंत्रिमंडळात आमदार होऊदेत असे सकडॆ यावेळी घालण्यात आले आहे.