वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उपराष्ट्रपती पदासाठी उद्या, 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडताच सायंकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणीही सुरू केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी रालोआचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची विरोधी पक्षाचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्याशी लढत होत आहे. सद्यस्थितीत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी पक्षाचे बहुमत असल्यामुळे सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. निवृत्त न्यायमूर्ती रेड्डी हे आंध्रप्रदेशचे आहेत, तर राधाकृष्णन हे तामिळनाडूचे आहेत. 21 जुलैच्या रात्री जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे.









