मयुर चराटकर
बांदा
बांदा परिसरात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले. सकाळपासुन मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडत असून एक वेगळा उत्साह मतदारामध्ये दिसत आहे. गोवा येथील खाजगी आस्थापनेवर रोजगारासाठी जाणाऱ्याना सुट्टी असल्याने यावेळी मतदान टक्का वाढणार असे चित्र आहे. बांदा परिसरात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली, अपक्ष उमेदवार विशाल परब आणि अर्चना घारे परब यांचे बुथ लागले असून खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी बुथना भेट देत आहेत.
Previous Articleविरोधक पंतप्रधानांना पत्र लिहिणार
Next Article संदेश पारकर यांनी बजावला मतदानाचा हक्क









