Sangli News : परंपरेप्रमाणे विटा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून आम्ही एकत्र लढवली होती. विरोधकांकडे बाजार समितीच्या विकासाची कोणती दूरदृष्टी नाही. त्यांनी केवळ आपला गट टिकवण्यासाठी निवडणूक लादली होती. मतदारांनी विरोधकांना त्यांची जागा दाखविली आहे. यापुढच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचा पारदर्शक कारभार केला जाईल. राज्य सरकारच्या माध्यमातून विटा बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल बाबर यांनी दिली.
खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस- शिवसेना-भाजप महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. सत्ताधारी गटाच्या १७ जागा जिंकल्या. या विजयानंतर अनिल बाबर यांनी तरूण भारतशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









