माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सतेज पाटील यांचे कौतूक : उपक्रम देसभर राबविण्यासाठी प्रयत्न करणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूरची भूमी सुपीक असून, या भूमीतून अनेक सुपीक कल्पना बाहेर येत असतात. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत ‘एक मिस्डकॉलवर नवीन मतदार नोंदणी’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. काँग्रेसच्या माध्यमातून हा उपक्रम राज्यतच नव्हे तर देशभर राबवण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’एका मिस्डकॉलवर मतदार नोंदणी’ अभियानाचा शुभारंभ आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज संजय पाटील, राजूबाबा आवळे, प्रदेश सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, शशांक बावचकर, सुर्यकांत पाटील-बुध्दीहाळकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य बाजीराव खाडे, महिला अध्यक्ष सुप्रिया साळोखे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पोवार, सांगली शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा : मिठावर कर लावला, त्यांना घालवलं; आता पिठावर कर लावणारेही जातील- बाळासाहेब थोरात
यावेळी बोलताना आमदार थोरात यांनी, काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे नवनवीन संकल्पना राबवून काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचे काम करत असून त्याचा मनस्वी आनंद होत आहे. वयाच्या 18 व्या वर्षी युवा पिढीला मताचा आधिकार देण्याचा क्रांतिकारी निर्णय दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला होता. त्यांच्या जयंतीदिनी नवीन मतदार नोंदणीचा उपक्रमाचा शुभारंभ करताना अतिशय आनंद होत आहे. या मुळे नव मतदारांना मतदानाचा अधिकार मिळण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम कॉग्रेसला बळकटी देण्यासाठी उपयु ठरेल. या माध्यमातून कॉंग्रेसचा विचार नवमतदारापर्यंत पोहचवून राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांना सक्रीय होण्यास मदत होईल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले, शशांक बावचकर यांनी आभार मानले.
या क्रमांकावर करा मिस्डकॉल
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 9672599990 या मोबाईल क्रमांकावर मिस्डकॉल द्यावा. यानंतर त्या मोबाईलवर संपर्क करून मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल.
मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
1 जानेवारी 2004 पूर्वी जन्म झालेल्या व्यक्तींना नवमतदार म्हणून नोंदणी करता येईल. जन्मतारीख पुरावा म्हणून जन्मदाखला, दहावी बोर्ड प्रमाणपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट यापैकी एक तसच रहिवासी दाखला म्हणून रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, बँक पासबुक, पासपोर्ट, अलीकडील लाईट, पाणी, गॅस कनेक्शन बिल यापैकी एक सेल्फ अटेस्टेड कागदपत्र व फोटो आवश्यक राहील. मिस्ड कॉल दिल्यानंतर यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिनिधी नवमतदारापर्यंत पोहचून पुढील प्रक्रिया पूर्ण करतील. तसेच नोंदणी बाबतची माहिती पुरवली जाईल असे त्यांनी सांगितले.









