केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाची जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी
बेळगाव : जिल्हा प्रशासनाने आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने 5 जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली. पण सदर मतदारयादी फक्त ‘कन्नड’ भाषेतच प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयाद्या मराठीत पुरविण्यासाठी निर्देश दिल्यानंतर मतदारयादींची मराठीमध्ये छपाई करून जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोग तसेच म. ए. युवा समितीला ई-मेलद्वारे केली आहे.









