वृत्तसंस्था/ वॉरसो (पोलंड)
येथे सामवारपासून सुरू होणाऱ्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या वॉरसॉ खुल्या आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेमध्ये रशियाची महिला टेनिसपटू व्हेरा व्होनारेव्हाला प्रवेशबंदीमुळे सहभागी होता आले नाही.
पोलंडच्या मंत्रालयाने व्होनारेव्हाला या आगामी स्पर्धेसाठी प्रवेश नाकारला आहे. सुरक्षिततेच्या कारणावरून पोलंडने रशियन नागरिकांना प्रवेश बंदीचा आदेश दिल्याने त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे. 38 वर्षीय व्होनारेव्हाने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत एकेरीतील 12 अजिंक्यपदे मिळवली आहेत. मात्र तिला अद्याप एकेरीचे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवता आले नाही.









