नवी दिल्ली
वोल्वो इंडियाने अधिकृतपणे आपली शक्तीशाली इलेक्ट्रिक कार ‘वोल्वो सी40 रिचार्ज भारतात विक्रीसाठी सादर केली आहे. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत ही 61.25 लाख रुपये (एक्सशोरुम) इतकी ठेवली आहे. वोल्वोने दावा केला आहे, की ही कार एका चार्जवर 530 किमी धावणार आहे. ही कार पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 27 मिनिटांचा कालावधी लागत असल्याची माहिती आहे.
अधिकृत बुकिंग सुरु
वोल्वो सी 40 रिचार्ज ही कंपनीच्या भारतीय लाईनअपमधील दुसरी शुद्ध इलेक्ट्रिक कार आहे. या एसयूव्हीचे अधिकृत बुकिंगही सुरु करण्यात आले आहे. ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईट व डीलरशिपवरुन देखील बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याची डिलिव्हरी ही येत्या काही आठवड्यांमध्ये सुरु होणार असल्याची माहिती आहे.









