कार 371 किमीचे मायलेज देणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्हेल्वो इंडिया आज भारतीय बाजारपेठेत आपली व्होल्वो सी 40 रिचार्ज ही लक्झ री कार सादर करणार आहे. यामध्ये 371 किलोमीटरचा टप्पा एका चार्जिंगवर गाडी पूर्ण करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
सदरची गाडीची किंमत ही 60 लाख रुपये राहणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. या कंपनीची देशातील ही दुसरी इलेक्ट्रिक
कार आहे. या अगोदर व्हेल्वोने सी40 रिचार्ज ईव्ही जुलै 2022मध्ये सादर केली असून याची एक्स शोरुम किमत ही 56.90 लाख रुपये आहे. कंपनी व्हेल्वो रिचार्ज ईव्हीची बेंगळूर जवळ होसकोटे प्रकल्पामध्ये निर्मिती करणार आहे. आगामी इलेक्ट्रिक कार लक्झरी कार विभागात मर्सिडीज बेंझ, बीएमडब्लू, ऑडी आणि ह्युंडाई यांच्यासोबत स्पर्धा करणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.









